बंद.
    • जिल्हा न्यायालय, रत्नागिरी संकुल

      जिल्हा न्यायालय, रत्नागिरी संकुल

    ताज्या बातम्या

    जिल्हा न्यायायलयाबद्दल

    रत्नागिरी येथे जिल्हा न्यायालयाची स्थापना सन १८६७ साली झाली असून श्री.जे.आर.नायलर, ESQ I.C.S. हे जिल्हा न्यायालय, रत्नागिरीचे पहिले जिल्हा न्यायाधीश हाेते. दिनांक २५ जानेवारी, १९९७ पर्यंत सिंधुदूर्ग जिल्हा रत्नागिरी जिल्हयाचाच एक भाग होता.

    कै.मंचरजे पेस्तनजी खारेघाट यांनी जिल्हा न्यायालय, रत्नागिरी येथे सन १८९५ - १९०० आणि १९०४ - १९१० या काळात जिल्हा न्यायाधीश म्हणून काम केले असून त्यांचा पुतळा जिल्हा न्यायालयाच्या न्यायदान कक्षामधील डायसवर ठेवणेत आलेला आहे. न्यायालयाकडे जाणाऱ्याया रस्त्याला जिल्हा न्यायाधीश श्री.खारेघाट यांच्या नावाने 'खारेघाट रोड' असे नाव देण्यात आलेले आहे.

    जिल्हा न्यायाधीश ठाकूर(टागोर) यांचे बंधू श्री रवींद्रनाथ टागोर हे १८८६-८७ या काळात जिल्हा न्यायाधीशांच्या बंगल्यात राहत होते. त्या बंगल्यात राहत असताना श्री रवींद्रनाथ टागोर यांनी बंगल्याच्या वायव्य बाजूला अरबी समुद्राकडे तोंड करुन दगडी बाकावर बसून कविता लिहीत्या आहेत. हे दगडी बाक अजूनही अस्तित्वात आहेत.

    रत्नागिरी जिल्हयाची न्यायालयीन रचनाः

    रत्नागिरी हा जिल्हा अरबी समुद्राच्या पूर्व किनारपट्टीवर वसलेला आहे. रत्नागिरी जिल्हयामध्ये रत्नागिरी, राजापूर, लांजा, संगमेश्वर,चिपळूण, गुहागर, खेड, दापोली आणि मंडणगड असे ०९ तालुके आहेत. जिल्हा न्यायालय हे रत्नागिरी येथे असून त्याठिकाणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जिल्हा न्यायाधीश-१ आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश, दिवाणी न्यायालय,(व.स्तर) मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय, दोन सह दिवाणी न्यायालय,(व.स्तर) व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालये आणि सहा सह दिवाणी न्यायाधीश,(क.स्तर) व न्यायदंडाधिकारी वर्ग-१ न्यायालये आहेत. खेड व चिपळूण या[...]

    अधिक वाचा
    मुख्य न्यायमूर्ती
    माननीय सर न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय
    श्री. एम. जे. जामदार
    माननीय पालक न्यायमुर्ती श्री. एम. जे. जामदार
    PDJ
    माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. एस. एस. गोसावी

    ई- न्यायालय सेवा

    ई न्यायालय सेवा उपयोजक (अँप)

    भारतातील दुययम न्यायालयांतील तसेच बहुतांश उच्च न्यायालयातील प्रकरणांची माहिती देते व दिनदर्शिका, सावधानपत्र (कॅव्हिएट) शोध आणि न्यायालय परिसराचे नकाशावर स्थान या सुविधा पुरविते.

    परतीच्या एस.एम.एस. व्दारे तुमच्या केसची सद्यस्थिती जाणून घ्या
    एस.एम.एस.
    ई न्यायालय 9766899899 या क्रमांकावर पाठवावा